मित्राचा मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार; व्हिडिओ काढत व्हायरल करणाऱ्या जोडप्यालाही अटक
Thane Crime: १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच एका मित्रानं कट रचून अत्याचार (abused) केल्याची धक्कादायक घटना.
ठाणे : भिवंडी शहरातील कामतघर परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच एका मित्रानं कट रचून अत्याचार केल्याची धक्कादायक घडली. अत्याचाराचा अश्लील व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून बलात्कार करणाऱ्या मित्रासह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मित्राला आणि मैत्रिणीला बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.
अधिक माहिती अशी की, “२९ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास मित्र हा पीडित मुलीला फिरण्याच्या बहाण्यानं बाहेर घेऊन गेला. त्यानंतर एका लॉजमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. खळबळजनक बाब म्हणजे, अत्याचार करतानाचा अश्लील व्हिडिओ मोबाईल कॅमेरात कैद केला आणि तो व्हिडिओ व्हायरल केला. या कटात त्याला साथ देणाऱ्या दुसऱ्या मित्राला आमि मैत्रिणीला बेड्या ठोकल्या आहेत.”
अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि या घटनेच्या एक महिन्यानंतर पीडितेनं भिवंडी शहर पोलिसांकडं तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी, त्याचा मित्र आणि मैत्रिणीवर गुन्हा दाखल केला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्याशी संपर्क साधला असता “या प्रकरणी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. आरोपींना १२ फ्रेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.
Web Title: Sexual abuse of a friend by a friend