Home क्राईम धक्कादायक! बालगृहातील ५ अल्पवयीन मुलींवर अत्याचार

धक्कादायक! बालगृहातील ५ अल्पवयीन मुलींवर अत्याचार

बालगृहात वर्षभरात पाच अल्पवयीन मुलींवर काळजीवाहकानेच लैंगिक अत्याचार (Sexual abuse) केल्याची धक्कादायक घटना, काळजीवाहक, अधीक्षिका आणि सचिवाविरुद्ध गुन्हा विधानसभेत प्रश्न उपस्थित.

Sexual Abuse of 5 minor girls in the orphanage

एरंडोल | जळगाव: तालुक्यातील खडके येथील बालगृहात वर्षभरात पाच अल्पवयीन मुलींवर काळजीवाहकानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी काळजीवाहक अधीक्षक व सचिव अशा तीन जणांविरुद्ध पोक्सो व अॅट्रॉसिटी कायद्यानुसार बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळजीवाहक गणेश शिवाजी पंडित ( वय ३२) आणि अधीक्षिका अरुणा गणेश पंडित (२९) यांना अटक केली आहे.

कै. यशवंतराव बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ (तळई, ता. एरंडोल) या संस्थेचे खडके येथे मुला- मुलींचे बालगृह आहे. जवळपास गेल्या वर्षभरापासून येथील काळजीवाहक गणेश पंडित हा पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत होता. मुलींनी वेळोवेळी अधीक्षिका व सचिव यांच्याकडे तक्रारी करूनही त्यांनी दुर्लक्ष केले. यानंतर महिला व बालकल्याण समितीकडे मुलींनी तक्रार केली. समिती सदस्यांपुढे मुलींचे व्हिडीओ जबाब घेण्यात आले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी, तसेच बालकल्याण समिती जळगाव बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट (न्यायपीठ) यांच्या आदेशाने पीडित मुलींना जिल्हा परीविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचालित मुलींचे बालगृह संस्थेत तात्पुरत्या स्वरूपात जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. या पाच अल्पवयीन मुलींपैकी एक आदिवासी समाजाची मुलगी आहे. या मुली ९ ते १२ वयोगटांतील आहेत.

Web Title: Sexual Abuse of 5 minor girls in the orphanage

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here