Home महाराष्ट्र अल्पवयीन असताना लैंगिक अत्याचार, आता बलात्कार पीडित तरुणीचे अंधारमय जीवन

अल्पवयीन असताना लैंगिक अत्याचार, आता बलात्कार पीडित तरुणीचे अंधारमय जीवन

Sexual abuse as a minor, now the dark life of a rape victim

अंबरनाथ: बलात्कारित महिलांच्या पुनर्वसनासाठी अनेक कायदे, योजना सरकारने केल्या असल्या तरी त्याचा फायदा अशा पिडीत महिलांना होताना दिसत नाही. उलट ज्या महिलांवर बलात्कार (rape victim) होतो तिलाच एका प्रकारे सामाजिक कैद सहन करावी लागते. असाच एक प्रकार अंबरनाथ शहरातील एक तरूणी मागील पाच वर्षापासून अनुभवत आहे.  ओळखीताल्याच व्यक्तीने अल्पवयीन असताना केलेला बलात्कार (Rape)आणि लैंगिक अत्याचार (Sexual abuse) करून त्याची चित्रफित काढून तयार करीत समाज माध्यमांवर प्रसारित केल्यामुळे पीडित मुलीचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले. समाजाची वाकडी नजर, टीका, टोमण्यांना घाबरून या तरूणीने गेल्या ५ वर्षात एकदा किंवा दोनदा घराचा उंबरठा ओलांडला आहे. त्यामुळे तिचे जीवन अंधारमय भविष्याच्या चिंतेने ग्रासले आहे.

घरची परिस्थिती बेताची असल्याने आपल्या कुटुंबियांना काहीसा आर्थिक आधार देण्यासाठी अंबरनाथमध्ये राहणाऱ्या या १६ वर्षीय तरूणीने उल्हासनगरच्या जीन्स कारखान्यात काम सुरू केले. अफजल मलिक असे या कंपनीच्या मालकाचे नाव होते. काही कारणास्तव मुलीने अजमल याची कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत काम स्विकारले. याचा राग मनात आल्याने अफजलने एके दिवशी तिला रस्त्यात गाठून फिरून येण्याच्या बहान्याने बदलापूरजवळील कोंडेश्वर परिसरात नेले. त्यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार (rape) आणि अनैसर्गिक अत्याचार (abusing) केला. आरोपी अफजल मलिक याने अत्याचार करतानाची चित्रफित तयार केली.

अत्याचाराची माहिती कुटुंबियांना दिल्यास ही चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित केली जाईल अशी धमकीही त्याने दिली. त्यामुळे मुलीने ही घटना घरी सांगितली नाही. मात्र, अजमलने ही चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित केली. ही चित्रफित समाजात पोहोचल्यानंतर एकच खळबळ उडाली. पीडितेने घरच्यांना याची माहिती दिल्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आरोपी अफजल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक झाली. पोलीस कोठडीनंतर त्याला जामीनह मिळवून  आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहे.

या घटनेने पीडित तरूणीचे संपूर्ण आयुष्यच उध्वस्त झाले आहे.  चित्रफितीनंतर काही शेजाऱ्यांनी तरूणीला मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे तरूणीने जंतुनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. समाजातील लोकांकडून टीका, टिप्पणी ऐकावे लागत असल्याने या तरूणीने गेल्या पाच वर्षात दोन ते तीन वेळाच घराचा उंबरठा ओलांडला आहे. पाच वर्ष झाले तरी पीडित तरूणी अजूनही त्या धक्क्यातून बाहेर पडलेली नाही.

Web Title: Sexual abuse as a minor, now the dark life of a rape victim

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here