Home क्राईम वृद्ध महिलेच्या घरात सेक्स रॅकेट, पोलिसांचा छापा, पर्दाफाश

वृद्ध महिलेच्या घरात सेक्स रॅकेट, पोलिसांचा छापा, पर्दाफाश

Sex racket: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. एका वृद्ध महिलेच्या घरातून सेक्स रॅकेट चालविले जात होते.

Sex racket in old woman's house, police raid, exposed

मुंबई:  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगाव परिसरात चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा  पर्दाफाश केला. एका वृद्ध महिलेच्या घरातून सेक्स रॅकेट चालविले जात होते. याबाबत एका 64 वर्षीय महिलेच्या घरातून सेक्स रॅकेट सुरू असल्याचे माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 10 ने या कारवाईत एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.

मुंबईमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटविरोधात मुंबई पोलिसांची कारवाई सुरू असते. मुंबई पोलीस गु्न्हे शाखा युनिट 10 ला गोरेगाव पश्चिम येथे एका घरातून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती समजली. त्यानंतर पोलिसांनी  कारवाई केली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर येथील इमारत क्रमांक 16 मधील रुम क्रमांक 242 मधून रॅकेट सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकरणी अरूणा संतोष सिंग (64 वर्ष),  रेश्मा फरीद शेख (30 वर्ष) आणि रिझवान नसीर सय्यद (31 वर्ष) हे तिघे हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासात आढळून आले आहे. या कारवाईत एक 16 वर्षीय मुलगी आणि एका महिलेची सुटका करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत मुलीची सुटका केली आहे.  पोलिसांनी रिझवानला अटक केली.  अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Sex racket in old woman’s house, police raid, exposed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here