चॉकलेटचे दाखवून सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
Pune Crime: चॉकलेटचे दाखवून सात वर्षीय चिमुकलीवर ६० वर्षीय वृद्धाने लैंगिक अत्याचार.
पिंपरी (पुणे): आमिष चॉकलेटचे दाखवून सातवर्षीय चिमुकलीवर ६० वर्षीय वृद्धाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना मंगळवारी दीडच्या सुमारास घडली. या प्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी करीम कादर खान याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी खेळताना दिसत नसल्याने तिच्या आईने शोध घेतला. त्यावेळी मुलीवर अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत याविषयी तक्रार केली. पोलिसांनी पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.
Web Title: the seven-year-old girl was Sexually assaulted by showing her chocolate