अहमदनगर: तीन हॉटेलवर छापा; सात मुलींची सुटका, वेश्याव्यवसाय चालविला..
Ahmednagar Prostitution Business: नेवासा पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सात परप्रांतीय मुलींची सुटका.
नेवासा फाटा: नेवासा फाटा परिसरातील तीन हॉटेलवर बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या उपस्थितीत नेवासा पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सात परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली.
नेवासा फाटा परिसरातील हॉटेल पायल, हॉटेल नामगंगा, हॉटेल तिरंगा येथे वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास नेवासा पोलीस
ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे, सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन नेवासा फाटा येथील वरील तीन हॉटेलवर छापा टाकला.
हॉटेल नामगंगा, हॉटेल तिरंगा येथून प्रत्येकी तीन मुली, हॉटेल पायल येथून एक मुलगी, अशा एकूण सात परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांनी दिली. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Web Title: Raid on three hotels; Rescue of seven girls, engaged in prostitution Business