सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून जीव घेतला, मृतदेह निर्जनस्थळी फेकला
Breaking News | Palghar Crime: सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून देण्यात आल्याचे समोर, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
पालघर: अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असून पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पोलिस ठाण्यात हद्दीत अशीच एक घटना पुन्हा उघडकीस आली आहे. यात सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून देण्यात आल्याचे समोर आले आहे.
मोखाडा तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेपूर्वी म्हणजे रविवारी संध्याकाळी मुलीच्या घराच्या बाजूला वाढदिवस साजरा केला जात होता. याच वाढदिवसाला मुलगी ये-जा करत होती. मात्र वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर देखील रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही. म्हणून रात्री साडेअकराच्या सुमारास मुलीच्या घराच्यांनी तिचा शोध सुरु केला असता मुलगी घरापासून दूर काही अंतरावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.
यानंतर घरच्यांनी सदर मुलीला लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदर प्रकरणी मोखाडा पोलीसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रात्रीपासूनच मोखाडा पोलीस ठाण्यात गर्दी झाली असून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. तर जव्हारचे उपाधिक्षक गणपत पिंगळे घटनास्थळी दाखल होत संपूर्ण तपासाची सूत्रे आपल्या हातात घेत तपासाला सुरवात केली आहे.
Web Title: seven-year-old girl was abused and killed, and the body was thrown
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study