Home पुणे संतापजनक! सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

संतापजनक! सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

seven year minor girl sexually abused in  Pimpri

Pimpri | पिंपरी: पार्किंगमध्ये सायकल खेळत असलेल्या सात वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पिंपरीगाव येथे सोमवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने मंगळवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जोएल एलिक हरर्बर्ट    वय ४२ रा. वैभवनगर पिंपरी असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी ही राहत्या घराच्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये सायकल खेळत होती. त्यावेळी कुत्रे आडवे आल्याने ती शेजारील बिल्डींगच्या पार्किंगमध्ये गेली. त्यावेळी आरोपीने तिला बोलावून बाजूला घेऊन गेला. त्याने अश्लील कृत्य केले. त्यानंतर मुलीने सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.  बाल लैंगिक प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

Web Title: seven year minor girl sexually abused in  Pimpri

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here