स्वतंत्र रेशनकार्ड करण्यासाठी लाच स्वीकारताना सेतू कर्मचाऱ्यांस अटक
Breaking News | Nashik Bribe Crime : पत्नी व मुलांचे स्वतंत्र रेशनकार्ड करण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना सेतू कर्मचाऱ्यांस अटक.
नाशिक: तक्रारदाराच्या पत्नी व मुलांचे स्वतंत्र रेशनकार्ड करण्यासाठी दोन हजारांची लाच (Bribe) स्वीकारताना सुरगाणा येथील सेतू कर्मचाऱ्यांस अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई गुरुवारी (ता. 20) केली.
सीताराम बनश्या पवार (३५, रा. रानविहिर, पो. सतखांब, ता. सुरगाणा, नाशिक) असे लाचखोरांचे नाव आहे. तक्रारदार यांच्या पत्नीचे व मुलांचे स्वतंत्र वेगळे रेशनकार्ड तयार करण्याकरिता 5 जून रोजी 2 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
याची पडताळणी विभागाने केल्यानंतर आज सुरगाणा येथील सेतू कार्यालयात सापळा रचण्यात आला. गुरुवारी लाचखोर पवार याने पंच, साक्षीदारासमक्ष तहसिल कार्यालय, सुरगाणा येथील सेतू कार्यालयात 2 हजारांची लाच स्वीकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील, शरद हेंबाडे, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, परशुराम जाधव, विलास निकम, अविनाश पवार यांनी बजावली.
Web Title: Setu employee arrested for taking bribe
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study