संगमनेरात ९०० किलो गोमांस वाहतूक करताना जप्त
Sangamner Crime: ९०० किलो गोवंश मांसासह पोलिसांनी तीन ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त Seized , एकास अटक.
संगमनेर: संगमनेर शहरातील सुरू असलेले अवैध कलखान्यांवर कितीही कारवाई झाली तरी बंद होत नसल्याचे चित्र वारंवार दिसत आहे. आज पुन्हा एकदा या खाण्यातून केलेले ९०० किलो गोवंश मांस वाहतूक करताना संगमनेर शहर पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ९०० किलो गोवंश मांसासह पोलिसांनी तीन ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
महाराष्ट्र शासनाने गोवंश कतल बंदीचा कायदा केलेला असताना संगमनेर शहर हद्दीत आज पहाटे संगमनेर खुर्द शिवारात एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्र पिकप बोलेरो गाडीतून गोवंश मांस घेऊन जाताना नाशिक जिल्ह्यातील आरोपीला पोलिसांनी पकडले. हलीम युसुफ शेख (हल्ली राहणार भारत नगर, मूळ रहिवासी कासारा, इगतपुरी, जिल्हा नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. पहाटे अडीय वाजण्याच्या सुमारास बोलेरो गाडीतून सुमारे २०० किलो गोवंश मांस घेऊन जाणाऱ्या या आरोपीला संगमनेर खुर्द शिवारात नवीन शेतकी पेट्रोल पंपाजवळ शिबलापूर रोड येथे संगमनेर शहर पोलिसांनी छापा टाकून पकडले व त्यास ताब्यात घेतले आहे. याबाबत हवालदार सुरेश कारभारी घोलवड यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Seized while transporting 900 kg of beef in Sangamner
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App