समाजसेवेच्या नावाखाली तो करायचा महिलेवर लैंगिक अत्याचार
Breaking News | Nagpur Crime: स्वयंघोषित नेत्याने महिलेचे लैंगिक शोषण केले.
नागपूर : समाजसेवेच्या नावावर एका स्वयंघोषित नेत्याने महिलेचे लैंगिक शोषण केले. मदतीचा विश्वास देऊन तिच्यावर अत्याचार (abused) करत होता. इतकेच नाहीतर याचे फोटो आणि व्हिडिओ तयार करून तिला ब्लॅकमेल करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने महिलेवर अत्याचार करण्यासोबतच तिच्या गुप्तांगावर शस्त्राने वार करून जखमी केले. ही खळबळजनक घटना गणेशपेठ पोलिस ठाण्यांतर्गत घडली.
पोलिसांनी 39 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा नोंदविला आहे. पंकज ऋषिसिंह खिंची (वय 42, रा. नाईक तलाव) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी पंकज हा समाजसेवक आहे आणि एक पक्षाचा कार्यकर्ताही असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित महिला ही सुद्धा एका पक्षाची कार्यकर्ती होती. जवळपास वर्षभरापूर्वी व्हॉट्सऍप ग्रुपवर तिची ओळख पंकज याच्याशी झाली. तो महिलेला मेसेज करू लागला.
पीडितेला 12 वर्षांची विशेष मुलगी आहे. तिचा पती दारूच्या आहारी गेला आहे. कोणताही आसरा नसल्यामुळे पीडितेने वर्षभरापूर्वी शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पंकजशी संपर्क केला. पंकजने तिला गणेशपेठ ठाण्यांतर्गत एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. तिचे त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान, फोटो आणि व्हिडिओही तयार करून पीडितेला ब्लॅकमेल करू लागला. पीडितेच्या पतीला दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. त्याने पीडितेला सोडले. तेव्हापासून ती बेलतरोडी परिसरात राहते.
आठवडाभरापूर्वी पंकज तिच्या घरी आला. पुन्हा तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान दोघांत वाद झाला. पंकजने शस्त्राने वार करून पीडितेला जखमी केले. पीडितेने घटनेची बेलतरोडी पोलिसात तक्रार केली.
Web Title: sexually assault women in the name of social service
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study