समनापुरचे प्रसिद्ध वडापाव सेंटर कोरोना प्रतिबंधक उल्लंघनप्रकरणी सात दिवस सील
संगमनेर | Samanapur: जिल्ह्यात व संगमनेर तालुक्यात करोनाने थैमान घातले असल्याने प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. दुकानदार स्वतः च्या स्वार्थापोटी इतरांचा जीव धोक्यात घालताना दिसून येत आहे.
संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील प्रसिद्ध वडापाव सेंटर हे ग्राहकांचे केंद्रस्थान आहे. या सेंटरवर आज सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास गटविकास अधिकारी कोरोना प्रतिबंधक पथकाने कारवाई केली आहे. हे वडापाव सेंटर सात दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. याठिकाणी कोरोना उपाययोजनाची पायमल्ली केली जात असल्याचे आढळून आल्याने ही कारवाई केली गेली आहे.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून शहरात व तालुक्यात कडक निर्बंध करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाईचे आदेश दिल्याने स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे. नागरिकांनी देखील प्रसासानाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Sealed for seven days in Samanapur famous Vadapav