Home अहिल्यानगर अहिल्यानगर: शाळकरी मुलीचा विनयभंग, माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत…

अहिल्यानगर: शाळकरी मुलीचा विनयभंग, माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत…

Breaking News | Ahilyanagar: शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल.

Schoolgirl molestation, saying I love you

नगर : शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली. अमित बाळासाहेब रासकर (रा. केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

अमित रासकर याने अंदाजे सहा महिन्यांपासून फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग सुरू केला होता. शाळेत येताना जाताना तिच्या मागे जाणे, आवाज देणे, गाडीचा हॉर्न वाजवणे, शुकशुक असा आवाज देणे, तसेच बोलण्याचा प्रयत्न करणे, असे प्रकार तो वारंवार करत होता. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिला अडविले. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याकडे का पाहत नाहीस? माझ्याशी का बोलत नाहीस? असे म्हणत तिला जबरदस्तीने रोखले. पीडितेने यास विरोध करत घरी सांगण्याची धमकी दिली असता, अमितने जर कोणाला सांगितले, तर तुझी बदनामी करीन आणि तुला ठार मारीन अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Schoolgirl molestation, saying I love you

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here