Home महाराष्ट्र शॉक लागून शाळकरी मुलाचा मृत्यू

शॉक लागून शाळकरी मुलाचा मृत्यू

नळाला पाणी आल्याने विद्युत मोटार लावताना विद्यार्थ्याचा शॉक (electric Shock) लागून मृत्यू (Death) झाल्याची घटना.

Schoolboy dies of electric shock

अंबाजोगाई : तालुक्यातील देवळा येथे नळाला पाणी आल्याने विद्युत मोटार लावताना विद्यार्थ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.

सुदाम चंद्रकांत पवार (१४) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. देवळा गावातील विश्वरुपी माध्यमिक विद्यालयात ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत आसलेला सुदाम चंद्रकांत पवार हा मंगळवारी शाळा सुटल्यावर घरी आला होता. यावेळी नळाला पाणी आले होते. आईला मदत करण्यासाठी त्याने पाणी भरण्यासाठी विद्युत मोटार लावत होता. यावेळी शॉक लागून तो जमिनीवर कोसळला. त्याला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुदामचे वडील चंद्रकांत पवार हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. सुदाम हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Schoolboy dies of electric shock

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here