अहमदनगर: शाळकरी मुलाचा तलावात बुडून मृत्यू
Breaking News | Ahmednagar: तलावात पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा बुधवारी (दि. ३१) सायंकाळी बुडून मृत्यू.
नगर: मित्रांसोबत निंबळक शिवारातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा बुधवारी (दि. ३१) सायंकाळी बुडून मृत्यू झाला. महंमद जैद मुनीर शेख (वय १२, मूळ रा. वडाळा बहिरोबा, ता. नेवासा, हल्ली रा. बोल्हेगाव, नगर) असे त्याचे नाव आहे.
महंमद आणि त्याचे तीन मित्र पोहण्यासाठी गेले होते. महंमदसह दोघांना पोहता येत नव्हते. ते खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले. मित्रांनी आरडाओरडा केल्यावर नागरिक मदतीला धावले. त्यांनी एकाला बाहेर काढले; मात्र महंमद बुडाला. काही वेळाने त्यालाही बाहेर काढले. त्याचे वडील मुनीर याकुब शेख व गावकऱ्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
Web Title: School boy drowned in lake
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study