अकोले: बिबट्याच्या झडपेतून चिमुकली वाचवली
Breaking News | Akole: आडोशाला दबा धरून बसलेला बिबट्या चाल करून चिमुकलीवर झडप मारण्याच्या तयारीत.
गणोरे : शेतातील झोपडीजवळ प्रातर्विधीसाठी बसलेल्या चिमुकलीवर झडप मारण्याच्या पवित्र्यातील बिबट्याला प्रसंगावधान राखून आरडाओरडा करीत पालकांनी पिटाळून लावले. अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी गावाच्या शिवारात आज गुरुवारी सकाळी सुमारे सहा वाजता हा थरारक प्रसंग घडला.
वीरगाव व पिंपळगाव निपाणी या दोन गावांच्या शिवेवरील सुपाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी शिवारातील शेतीच्या कामासाठी मजुरांनी वस्ती केली आहे. गुरुवारी सकाळी सुमारे सहा वाजता आठ वर्षांची जयश्री प्रातर्विधीसाठी झोपडीजवळच बसली होती. जवळच आडोशाला दबा धरून बसलेला बिबट्या चाल करून चिमुकलीवर झडप मारण्याच्या तयारीत दिसताच; शेजारीच उभे असलेले तिचे मामा किरण खोडके, वडील नामदेव भुतांबरे, अचरा साटे गोराटेत शेजागांनी आरडाओरडा करीत बिबट्याला पिटाळून लावले. वीरगावच्या शिवारात गेल्या शुक्रवारपासून हल्लेखोर बिबट्या मादीची दहशत आहे. तिने दोन शेतकऱ्यांना जखमी केले होते. दोघांवर धावली होती. तेंव्हापासून अनेक शेतकऱ्यांच्या वस्तीवर, शेतातील उंच वाढलेल्या पिकांमध्ये तसेच रहदारीचे रस्ते ओलांडताना ठिकठिकाणी बिबटे आढळून आले आहेत. शेतकऱ्यांना आपल्या जनावरांची चिंता होतीच. पण आता बिबटे माणसांवरही गुरगुरत असल्याने मुलांच्याही सुरक्षेची चिंता वाढली आहे.
Web Title: Saved the little one from the clutches of the leopard
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study