सत्यजित तांबे यांच्या पंतप्रधान मोदींना खोचक शुभेच्छा
अहमदनगर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असल्याने देशभरातून शुभेच्छा येत आहेत. राहुल गांधी यांनी सुद्धा मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी बेरोजगारीचा मुद्दा घेत खोचक ट्वीट करत पंतप्रधान यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींचा वाढदिवस काँग्रेसकडून राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. त्याच हेतूने तांबे यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘तुम रोक ना पाओगे, वह तूफान बन कर आएगा। आज का बेरोजगार, तुम्हारी सत्ता उड़ा ले जाएगा…’ असं तांबे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मोदी सरकारने २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली होती मात्र तिच्यापासून जनतेला कोणताही फायदा झाला नाही. मोदी सरकारने तरुणांना कोणताही दिलासा नाही उलट बेरोजगारी वाढवली आहे, असा आरोपही करण्यात येत आहे, म्हणून त्यांनी असे ट्वीट केले आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Satyajit Tambe’s best wishes to Prime Minister Modi