सत्यजित तांबे यांच्या अडचणीत वाढ, ना घर का ना घाट का होण्याची अवस्था
Nashik Graduate Constituency Election: Satyajeet Tambe; भाजपच्या एका गटाने तांबे यांना विरोध करत जोरदार निदर्शनही केली, भाजपची कोंडी.
नंदुरबार: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचा प्रचार संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. परंतु, अजूनही अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपने पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीचं सस्पेन्स वाढला आहे. भाजप तांबे यांना पाठिंबा देईल असं सांगितलं असतानाच भाजपमधूनच आता तांबे यांना पाठिंबा देण्यास जोरदार विरोध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे सणाऱ्या व्यक्तीला पाठिबा का म्हणून द्यायचात असा सवाल करत भाजपच्या एका गटाने तांबे यांना विरोध करत जोरदार निदर्शनही केली आहे. त्यामुळे तांबे यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपाची डोकेदुखी वाढणार असून तांबे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महागाईविरोधातील आंदोलनात सत्यजित तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले होते. ज्या उमेदवाराला देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या नेत्याचा सन्मान करता येत नाही, त्याला भाजपने पाठिबा देऊ नये. भाजपने पाठिंबा दिला तरी सुज्ञ नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते सत्यजित तांबे यांना मतदान करणार नाहीत, असा इशारा नंदूरबारमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
नंदूरबामधील भाजपचे पदाधिकारी केवळ इशारा देऊनच थांबले नाहीत तर त्यांनी सत्यजित तांबे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले. भाजपच्या माजी नगरसेविकेचे पुत्र लक्ष्मण माळी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आहे. शेकडो तरुणांनी या आंदोलनात भाग घेतला होता. यावेळी सत्यजित तांबेंविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
यावेळी आंदोलकांच्या हातात एक बॅनर होते. त्यावर सत्यजित तांबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या बॅनरला काळे फासताना दिसत आहेत. भाजपच्या एका गटाच्या या अनोख्या आंदोलनामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Web Title: Satyajeet Tambe’s problem is increasing, neither home nor Ghat
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App