Home जळगाव प्रचार मेळाव्यात पाहा झालं तरी काय? भाजपच्या पाठींब्यावर सत्यजित तांबे म्हणाले…

प्रचार मेळाव्यात पाहा झालं तरी काय? भाजपच्या पाठींब्यावर सत्यजित तांबे म्हणाले…

Nashik Graduate Constituency Election: Satyajeet Tambe; राजकीय विषयावर योग्य वेळी बोलेल, असे म्हणत सत्यजित तांबे यांनी बोलणे टाळले. 

Satyajeet Tambe said on the support of BJP

जळगाव: चार दिवसांवर नाशिक पदवीधर मतदारसंघांची निवडणूक येवून ठेपली आहे. मात्र सत्यजित तांबे यांना पाठींबा देण्याबाबत भाजपने त्यांची अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. यावर जळगाव दौऱ्यावर असलेल्या सत्यजित तांबे यांना विचारले असता, त्यांनीही चुप्पी साधली आहे. राजकीय विषयावर योग्य वेळी बोलेल, असे म्हणत सत्यजित तांबे यांनी बोलणे टाळले. नेमक सत्यजित तांबे यांच्या गप्प राहण्यामागचे नेमक कारण काय यावरुन आता वेगवेगळया राजकीय चर्चांना उधाणं आलेलं आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. जळगावातील लेवाभवन येथे गुरुवारी त्यांचा प्रचाराचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर तांबे हे पत्रकारांशी बोलत होते. जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांचा, तरुणांचा तसेच मोठा प्रतिसाद मला मिळत असल्याचेही यावेळी सत्यजित तांबे म्हणाले.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

काँग्रेसचा राजीनामा दिल्याच्या विषयावर विचारले असता, सत्यजित तांबे यांनी यावेळी बोलणार असल्याचं उत्तर दिले. तर भापचा पाठींबा यासह इतर राजकीय विषयावरही सत्यजित तांबे यांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता याबाबत आपण नंतर आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगत तांबे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळले आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Satyajeet Tambe said on the support of BJP

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here