अकोले तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सर्वोदयच्या संघाने पटकावली विजयी ट्रॉफी
Rajur News: कबड्डी स्पर्धेत (१९ वर्षे वयोगटातील) राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्यालयाच्या संघाने पटकावली विजयी ट्रॉफी.
राजूर : अकोले तालुकास्तरीय मुलांच्या शालेय कबड्डी स्पर्धेत (१९ वर्षे वयोगटातील) राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्यालयाच्या संघाने विजयी ट्रॉफी पटकावली आहे. अकोले येथील अगस्ती महाविद्यालयाच्या संघास मोठ्या फरकाने पराभूत करत अजिंक्यपद पटकविले आहे.
अकोले येथील अभिनव पब्लिक स्कूलमध्ये संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत तालुक्यातील ४० हून अधिक शाळांतील संघ सहभागी झाले होते.
१४ वर्षे, १७ वर्षे आणि १९ वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील तिन्ही प्रकारांत पाटणकर विद्यालयातील संघ सहभागी झाले होते.
१९ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात अगस्ती महाविद्यालाच्या बलाढ्य संघाला ९ गुणांनी पराभूत करत अजिंक्यपद पटकावले असून, हा संघ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरला असल्याचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी सांगितले.
अंतिम सामन्यातील खेळाडूंची नावे:
अंतिम सामन्यात अनिकेत अशोक देशमुख, राहुल दिलीप डगळे, तेजस दशरथ लोटे, हेमंत पंढरीनाथ चौधरी, वीर अल्पेश मेहता, नयन भरत घिगे, अनिकेत हरिदास बांडे, रितेश करमसिंग माचरेकर, विशाल नवनाथ म्हशाळ, दीपक ढवळा पोटकुले, शुभम तानाजी देशमुख या खेळाडूंचा समावेश होता.
मार्गदर्शक:
या संघास क्रीडा शिक्षक जालिंदर आरोटे, विनोद तारू, सचिन लगड यांचे मार्गदर्शन लाभले.
अभिनंदन व शुभेच्छा:
यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक क्रिडा शिक्षकांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख, सचिव टि.एन. कानवडे, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, संचालक मिलिंद उमराणी, मारूती मुठे, अशोक मिस्त्री, विजय पवार, विलास पाबळकर, माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, प्रकाश महाले, प्राचार्य भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदींनी अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Web Title: Sarvodaya’s team won the trophy in the Akole taluka level kabaddi
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App