अकोले: सर्वोदय विद्या मंदिर, राजूर उच्च माध्य. विद्यालयात कलामंडळ उदघाटन कार्यक्रम संपन्न
अकोले: सर्वोदय विद्या मंदिर, राजूर उच्च माध्य. विद्यालयात कलामंडळ उदघाटन कार्यक्रम संपन्न
राजूर: अकोले तालुक्यातील राजूर गावातील गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवार दिनांक १७ ऑक्टोबर सकाळी ८:३० वाजता कलामंडळ उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला. मराठवाड्यातील कवी नागेश शेलार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एम.डी. लेंडे होते. तर कार्यक्रमाचे आयोजन श्री. संतराम बारवकर यांनी केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक नागेश शेलार यांनी प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलित करून श्रीफळ वाढविले. विद्यालयाचे प्राचार्य श्री. एम.डी. लेंडे यांनी प्रमुख उद्घाटक नागेश शेलार यांचा सत्कार केला. तसेच विद्यालयाचे उप-प्राचार्य श्री. पर्बत एल.पी. यांनी अध्यक्षांचा सत्कार केला.
कवी नागेश शेलार यांनी सामाजिक, राजकीय, प्रेमविषयक कविता सादर करून विद्याथ्यांचे व उपस्थितांचे मने जिंकली. ऊस तोडणीला गेलेले बाळ त्यामुळे घरातील म्हाताऱ्या आईची होणारी तगमग त्याच्या विषयी येणारी आठवण, त्यांनी ‘निम्बोनीचा काटा’ या कवितेतून व्यक्त केली. आजचे सामाजिक वातावरण अगदी अविश्वासाचे झाले आहे. गर्भातील मुलाचा देखील आईवर विश्वास नाही कि ती मला जन्माला घालेल का? की गर्भातच माझी हत्या करेल! अशी भावना त्यांनी आपल्या विश्वास या कवितेतून व्यक्त केली. समोरील प्रेक्षकांची मानसिकता लक्षात घेता प्रेमविषयक कविता देखील त्यांनी सादर केल्या. विविध कवितेला अशायानारूप चाली लावल्या व त्यामुळे कवितेतील गोडवा पटकन लक्षात आला. कविता वाचन करीत करीत त्यांनी विद्यार्थ्यांना साहित्य निर्मितीचे धडे देखील दिले. कविता कशी जन्माला येते याचा स्वनाभुव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एम.डी. लेंडे सर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांतून उद्याचे लेखक,कवी जन्माला येवोत असे आवाहन केले.
हा कार्यक्रम श्री. संतराम बारवकर सर व श्री. घिगे बी. एस. यांनी आयोजित केला. तर या कार्यक्रमाची अध्यक्षीय सुचना श्री. मढवई सर यांनी दिली व त्यास अनुमोदन श्री. धतुरे ए. एफ. सर यांनी दिले. कु. साक्षी साबळे या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यालयाचे उप-प्राचार्य श्री. पर्बत एल.पी. यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एम.डी. लेंडे, उप-प्राचार्य श्री. पर्बत एल.पी. जेष्ठ शिक्षक गुजराथी सर, पाबळकर सर, ताजणे सर, श्री. घिगे बी. एस, श्री.जोरवर व्ही.एम. श्री. तुपविहीरे एस.व्ही. श्री. गुंजाळ ए.डी., श्री. तळेकर ए.डी. व सर्व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा