Home अकोले राजूर: गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाला सुयश

राजूर: गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाला सुयश

राजूर: अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले. विद्यालयाचा एकूण निकाल 79.35% लागला.

अत्यंत महत्वाच्या या निकालाकडे सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक आतुरतेने व कुतूहलाने वाट बघत होते , कारण विद्यार्थ्यांच्या कारकीर्दीच्या दृष्टीने दिशा ठरविण्याकरिता हा निकाल महत्वाचा मानला जातो.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यात गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थांनी घवघवीत यश मिळविले. विद्यालयाचा एकूण निकाल 79.35% लागला. मोहटे ओंकार आत्माराम याने 88.46% गुण मिळवून कनिष्ठ विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकविला आहे. कु.काठे सारिका जयराम हिने 82.30% गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळविला आहे तर तांबोळी सानिया मुसा हिने 82.15% गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळविला आहे.

शाखा निहाय निकाल:

विज्ञान शाखा – 86.95%

वाणिज्य शाखा – 92.10%

कला शाखा – 68.39%

शाखा निहाय पहिले तीन विद्यार्थी:

विज्ञान शाखा –

१) दुटे दिपक बाळू –  73.54%

२) काळे रोहिणी किसन – 66.62%

३) साबळे साक्षी दत्तात्रय  – 65.08%

वाणिज्य शाखा-

१) मोहटे ओंकार आत्माराम – 88.46%

२) काठे सारिका जयराम  – 82.30%

३) तांबोळी सानिया मुसा  – 82.15%

कला शाखा –

१) झाबाडे सुनंदा काळू  – 76.61%

२) साबळे प्रमोद सावळेराम  – 74.92%

३)  चव्हाण आरती रमेश – 73.69%

सत्यानिकेतन संस्थेच्या वतीने संस्थेचे मा.सचिव प्रा. टी. एन. कानवडे व सह सचिव श्री मिलिंदशेठ उमराणी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले.

तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य श्री. लेंडे एम.डी. उपप्राचार्य पर्बत एल.पी. जेष्ठ शिक्षक गुजराथी सर, श्री.पाबळकर एस.एस. आणि सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती कर्मचार्यांनी अभिनंदन केले.

Website Title: Sarvoday Vidya Mandir Junior College HSC Result 2019 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here