संगमनेर: सरपंचाकडून प्राथमिक शिक्षकास मारहाण व धमकी
Sangamner Crime: जवळेबाळेश्वर येथील घटना : व्हॉट्सअॅप ग्रुपवर बातम्या पाठविल्याचा राग, ‘पुन्हा नादाला लागला तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी.
संगमनेर: व्हॉट्सअँप ग्रुपवर बातम्या पाठविल्याच्या कारणावरून सरपंचाने एका आदिवासी प्राथमिक शिक्षकास मारहाण केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर गावचे शिवारात शुक्रवारी (दि. १३) सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी शिक्षक संजय धोंडीबा कौटे (वय ४६, रा. जवळे बाळेश्वर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरपंच रामकृष्ण नाथा पांडे (रा. जवळेबाळेश्वर) यांच्याविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कौटे हे कोठे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. ते जवळेबाळेश्वर येथे राहतात. शुक्रवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास गावातील एका पंक्चर दुकानाजवळ ते आले असता येथील सरपंच रामकृष्ण पांडे तेथे आले. ‘तू गावच्या ग्रुपवर बातम्या का पाठवतो’ असे म्हणत कौटे यांस शिवीगाळ केली. डोक्यात व डाव्या डोळ्याजवळ कुबडी मारत ढकलून दिले. ‘पुन्हा नादाला लागला तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे कौटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक फौजदार आर. ए. गांधले हे करीत आहेत.
Web Title: Sarpanch beat and threatened primary teacher crime filed
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App