Home अहमदनगर अहमदनगर रुग्णालय आगीवरून संजय राउतांची केंद्रसरकारवर टीका

अहमदनगर रुग्णालय आगीवरून संजय राउतांची केंद्रसरकारवर टीका

Sanjay Raut criticizes central government over Ahmednagar 

अहमदनगर | Ahmednagar: “फक्त अश्रू ढाळू नका तर ठोस पावले काय उचलणार ते सांगा असा प्रश्न संजय राउत यांनी दोन्ही सरकारला केला आहे”. एकीकडे राज्यात दिवाळीचा सन साजरा होत होता तर दुसरीकडे अहमदनगर रुग्णालयात आग दुर्घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून दोन्ही सरकारवर तोफ डागली आहे. 

रुग्णालयात आग शोर्टसर्किटमुळे लागली असली तरी आरोग्य व्यवस्थेची ही होरपळ कोठेतरी थांबायला हवी. अर्थात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही केंद्रसरकार व राज्यसरकार या दोघांचीही जबाबदारी आहे. सध्या मरण स्वस्त झाले आहे हे मान्य आहे पण इतके अमानुष व क्रूर असावे? सरकारने आता फक्त अश्रू ढाळू नयेत तर असे पुन्हा घडू नये यासाठी पुढे काय ठोस पावले उचलणार ते फक्त सांगा असा सवाल केंद्रसरकार व राज्यसरकारला विचारला आहे. देशाची आरोग्य व्यवस्था ही कुचकामी असल्याचे कोरोना काळात निदर्शांस आलेच आहे. हे चित्र तथाकथित महासत्ता म्हणवून घेणाऱ्या देशाला शोभत नाही. 

Web Title: Sanjay Raut criticizes central government over Ahmednagar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here