Sangamner | संगमनेर: राहत्या घरात छताच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कान्होरेमळा (घारगाव) येथे रविवारी (दि.13) दुपारी दोन ते तीन वाजेच्या उघडकीस आले.आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
रोहित चंद्रकांत शिंदे (वय -21, कान्होरेमळा, घारगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
घारगाव पोलिसांकडून माहितीनुसार, रोहितची आई राजश्री साफसफाई कामानिमित्त पोलीस ठाण्यात तर वडील चंद्रकांत शेतीच्या कामावर गेले होते. रोहित घरात झोपलेला होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास राजश्री ह्या घरी आल्यानंतर अनेकदा आवाज देऊनही मुलगा रोहित उठला नाही. राजश्री यांनी पुतण्या स्वप्नील यास बोलून घेत खिडकीतून पाहिले असता रोहित याने राहत्या घरात छताच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत राजश्री यांनी पती चंद्रकांत यांना कळविले. चंद्रकांत यांनी तातडीने खाजगी डॉक्टरांना बोलावले. मात्र, डॉक्टरांनी रोहितला मयत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. रोहितच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
चंद्रकांत महादू शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे करीत आहेत.
Web Title: Sangamner Young man commits suicide by strangulation