संगमनेर: दुचाकीचा पाठलाग करीत महिलेचा विनयभंग, व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी
Sangamner News: तालुक्यातील एका गावात विवाहित महिलेचा दुचाकीवरुन पाठलाग करत विनयभंग (Molested) केल्याची घटना.
संगमनेर: तालुक्यातील एका गावात विवाहित महिलेचा दुचाकीवरुन पाठलाग करत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. तसेच तुझी समाजात बदनामी करेल अशी धमकीही दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोल्हेवाडी येथील रविंद्र गंगाधर वाकचौरे याने एका गावातील महिलेचा दुचाकीवरुन पाठलाग करून त्या महिलेचा विनयभंग केला व महिलेच्या नातेवाईकांसह गावातील लोकांना रात्रीचे फोन करून तुझी समाजात बदनामी करेल अशी धमकीही दिली आहे.
त्यानंतर कोल्हे याने महिलेसह तीच्या पतीला फोन करून तुम्ही जर पोलिस स्टेशनला जावून तक्रार दिली तर तुमचे व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच महिलेचे सासरे यांनाही फोन करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी रविंद्र वाकचौरे याच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 354, 354, (ड), 507 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक फौजदार सतिश पाटोळे हे करत आहे.
Web Title: Sangamner woman was molested while chasing a bike
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App