Home क्राईम संगमनेर: ३० लाखाच्या खाद्यतेलाच्या चोरीप्रकरणी दोघांना अटक

संगमनेर: ३० लाखाच्या खाद्यतेलाच्या चोरीप्रकरणी दोघांना अटक

Sangamner Two arrested for stealing edible oil

संगमनेर | Sangamner: सुरत येथून ३० लाख रुपये किमतीच्या खाद्यतेलाच्या अपहारप्रकरणी गोव्यातून अटक करण्यात आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन जणांना अटक केली असून दोघे जण फरार असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली.

नरेंद्र राजेंद्रसिंग रोतेला रा. अहमदनगर, अनिल भारत मिरपगार रा. अहमदनगर, किशोर पदूने रा. पंढरपूर व अजय कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

नरेंद्र राजेंद्रसिंग रोतेला रा. अहमदनगर, अनिल भारत मिरपगार रा. अहमदनगर यांना गोव्यातून अटक करण्यात आली आहे तर किशोर पदूने रा. पंढरपूर व अजय कांबळे हे दोघे पसार झाले आहेत.

अशोककुमार रामनिवास चौधरी रा. सुरत गुजरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेरमधील अरुण उदमले ट्रकचालक व अफजल खान साहेबपठाण ट्रकमालक रा. संगमनेर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु त्यांनी हा गुन्हा केला नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माळी हे करीत आहे.

Web Title: Sangamner Two arrested for stealing edible oil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here