संगमनेर: महिलेस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी
Breaking News | Sangamner Crime: विवाहबाह्य प्रेम संबंधाबाबत विचारणा केल्याने महिलेस बेदम मारहाण झाल्याची घटना.
संगमनेर : विवाहबाह्य प्रेम संबंधाबाबत विचारणा केल्याने महिलेस बेदम मारहाण झाल्याची घटना शहरातील एका परिसरात नुकतीच घडली.
शहरातील एका परिसरात राहणाऱ्या आरोपीला विवाहबाह्य प्रेम संबंधाबाबत महिलेने विचारणा केली. तेव्हा त्याने या महिलेला लाकडी काठीने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच त्याने दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी अभिषेक पठाडे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Sangamner Threatened to kill a woman by beating her