संगमनेर: पैशाचा पाऊस पाडणारी टोळी जेरबंद
पैशाचा पाऊस पाडणारी टोळी जेरबंद
आरोपींमध्ये संगमनेरच्या तरुणाचा समावेश
संगमनेर: – जमिनीतुन सोने काढुन देतो, पैशाचा पाऊस पाडतो, असे सांगत राज्यभर लुट करणाऱ्या टोळीला अखेर दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचुन पकडले आहे. शुक्रवारी बीड तालुक्यातील समनापुर येथे ही कारवाई करण्यात आली.
You May Also Like: Suhana Khan age, Birthdate, Biography, height
भाऊसाहेब गिरी (रा. बीलोनी ता. वैजापुर जि. औरंगाबाद), बाबासाहेब पोपट बोंडवे (रा. वढुखुर्द ता. हवेली जि. पुणे), राहुल संजय वाळके (रा. पेरणे फाटा ता.हवेली जि. पुणे), देवेंद्र भाऊदास वैष्णव (रा. नान्नज ता. संगमनेर जि. अ.नगर)अशी या आरोपींची नावे आहेत. लाल कपडा घेऊन त्यात त्यांच्याकडील पितळी बिस्कीट ठेवायचे आणि ज्यांना सोने हवे असेल त्यांच्याकडील सोने घेऊन त्या लाल कपडयात टाकल्यासारखे करायचे. मोठ्या हातचालाखीने सोने काढुन ते लाल कपडा शेतात पुरुन ठेऊन ८ दिवसांनी उघडुन पहा असे म्हणुन फरार व्हायचे . बीड तालुक्यातील समनापुर येथील येथील नागरिक राजेभाऊ गोरे यांच्या फिर्यादावरुन गुन्ह्याची नोंद झाली आहे. गुरुवारी रात्री पुण्याची एक टोळी समनापुर येथे पैशांचा पाऊस पडणार असल्याची बातमी पोलिसांना लागली. पोलिसांनी छापा टाकला आणि ताब्यात घेतले.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.