Home संगमनेर संगमनेर: नाशिक- पुणे महामार्गावरील टेम्पो आणि ट्रकचा अपघात- Accident News

संगमनेर: नाशिक- पुणे महामार्गावरील टेम्पो आणि ट्रकचा अपघात- Accident News

Sangamner Tempo and truck accident on Nashik-Pune highway

Ahmednagar News | Sangamner | संगमनेर: तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील खंदरमाळ शिवारात टेम्पो आणि ट्रकचा अपघात (Accident) झाल्याची घटना बुधवारी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की,  बुधवारी दि. २ जून रोजी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर हॉटेल बिकानेर समोर खंदरमाळ शिवारात  टेम्पो (क्रमांक MH14 EM3330) ह्यांच्यावरील चालक बालाजी दिलीप बोईनवाड (वय 27 रा सावरगाव नसरत ता.लोहा जिल्हा नांदेड) जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रक (क्रमांक MH12SX9844) वरील चालक विनायक पुंजा आंधळे ( वय 30रा केडगाव अहमदनगर ) याने पाठीमागून जोराची धडक देऊन अपघात झाला सदर अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

या घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी योगीराज यांच्या मार्गदर्शनाखाली सोनवणे सुनिल साळवे मनेश शिंदे उमेश गव्हाने आदिंनी घटना स्थळी धाव घेत अपघात ग्रस्त वाहणे महामार्गाच्या बाजूला घेण्यात आली.

Web Title: Sangamner Tempo and truck accident on Nashik-Pune highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here