Home संगमनेर संगमनेर तालुक्यात बुधवारी २५ करोना पॉझिटिव्ह

संगमनेर तालुक्यात बुधवारी २५ करोना पॉझिटिव्ह

Sangamner Taluka Wednesday 25 corona Positive

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात २५ करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. खासगी अहवालात १२ जण तर अॅटीजेन चाचणीत १३ बाधित आढळून आले आहेत.

बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात जोर्वे रोड संगमनेर येथे २८ वर्षीय पुरुष, गोल्डन सिटी संगमनेर २५ वर्षीय तरुण, विद्यानगर येथे ७२ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ४०,५१ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथे ६८ वर्षीय पुरुष, ताजने मळा येथे १९ वर्षीय तरुण, मालपाणी नगर येथे १६ वर्षीय पुरुष, कुंभार गल्ली येथे ३२ वर्षीय पुरुष, असे ९ जण बाधित आढळून आले आहेत.  

 तर ग्रामीण भागात निमज येथील ४८ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, रायते येथे १६ वर्षीय मुलगा, राजापूर येथे ४० वर्षीय महिला, १८ वर्षीय तरुण, जोर्वे येथे २९ वर्षीय तरुण, खंदरमाळ येथे ६७ वर्षीय पुरुष, ६२,५५ वर्षीय महिला, पारेगाव खुर्द २३ वर्षीय तरुण, मालदाड येथे २५ वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे ४० वर्षीय तरुण, घारगाव येथे ६७ वर्षीय महिला, कसारा दुमाला येथे ४१ वर्षीय पुरुष, निमगाव बुद्रुक ४१ वर्षीय पुरुष असे १५ जण बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner Taluka Wednesday 25 corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here