Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात २३ करोना रुग्ण पॉझिटिव्ह

Sangamner: संगमनेर तालुक्यात २३ करोना रुग्ण पॉझिटिव्ह

Sangamner taluka Today 19 coronavirus infected

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यात मंगळवारी २३ करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ८४१ झाली आहे. 

खासगी प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील भरीतकर मळा ६१ वर्षीय पुरुष, मालदाड रोड ६३ वर्षीय व्यक्ती, देवी गल्ली येथे ५५ वर्षीय व्यक्ती, तालुक्यातील वेल्हाळे येथे ४९ वर्षीय पुरुष, जोर्वे येथील २४ वर्षीय तरुण, कौठे बुद्रुक येथे ४२ वर्षीय पुरुष, खराडी येथे २८ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे. 

रॅपिड अॅटीजन टेस्ट अहवालानुसार तालुक्यातील घुलेवाडी येथील २५ वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक येथील ५० व ४५ वर्षीय पुरुष, जांबूत खुर्द येथील ६२,६४ वर्षीय पुरुष, २० वर्षीय तरुण, ६० वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आली आहे. निमोण येथे ५४ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, २० व ३० वर्षीय तरुण करोनाबाधित आढळून आले आहेत. शहरातील अभिनवनगर मध्ये ६८ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. 

खासगी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालात शहरातील ऑरेंज कॉर्नर येथे ४६ वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे २३,५२,४५ वर्षीय पुरुष,४१ व ४९ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहेत, असे दिवसभरात २३ रुग्ण आढळून आले आहेत.

वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner taluka Today 23 coronavirus infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here