Sangamner: संगमनेर तालुक्यात गुरुवारी 50 जण बाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातून गुरुवारी 50 जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 18 तर ग्रामीण भागातून 32 जणांचा समावेश आहे. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या 4796 इतकी झाली आहे.
गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात विद्यानगर येथे 65 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय तरुण, 58,28 वर्षीय महिला, नवीन नगर रोड येथे 47 वर्षीय महिला, गांधी चौक येथे 70,45 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला,स्वामी समर्थ नगर येथे 47 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे 46, 33, 21,17 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी रोड येथे 50 वर्षीय पुरुष, 65,35 वर्षीय महिला, देवाचा मळा येथे 60 वर्षीय पुरुष, संगमनेर 29 वर्षीय तरुण असे 18 जण बाधित आढळून आले आहेत.
ग्रामीण भागात प्राप्त झालेल्या अहवालानुसार जोर्वे येथे 70 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे 60,48 वर्षीय पुरुष, 52, 45,45,21 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे 63 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे 63 वर्षीय पुरुष, 57,47 वर्षीय महिला, पळसखेडे येथे 52,45 वर्षीय महिला, कोकणगाव येथे 70 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथे 33 वर्षीय पुरुष, खांडगाव येथे 42 वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथे 40,32 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथे 80 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय बालिका, रहिमपूर येथे 50 वर्षीय पुरुष, उंबरी बाळापूर येथ 61 वर्षीय पुरुष, 40, 38,16 वर्षीय पुरुष, कोंंची येथे 30 वर्षीय पुरुष, प्रतापपुर येथे 31 वर्षीय पुरुष, दाढ बुद्रुक येथे 60 वर्षीय पुरुष, निमज येथे 30 वर्षीय पुरुष, पिंपळगाव कोंझिरा येथील 82,52 वर्षीय महिला असे 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
Web Title: Sangamner Taluka Thursday 50 corona infected