संगमनेर: प्रेम प्रकरणातून महाविद्यालयीन तरुणाचा चाकूने भोकसून खून
संगमनेर: प्रेम प्रकरणातून महाविद्यालयीन तरुणाचा चाकूने भोकसून खून
संगमनेर: फिरायला गेलेल्या दोन महाविद्यालयीन युवकांमध्ये वाद झाल्याने या वादातून एका युवकाचा खून करून त्याचा मृतदेह तालुक्यातील खांडगाव येथील कपालेश्वर मंदिराजवळ फेकण्यात आला. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आज सकाळी या आरोपीने पोलिसांना घटनास्थळी नेऊन हा मृतदेह दाखविला. हा खून शनिवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी करण्यात आला अशी कबुली आरोपीने दिली.
You May Also Like: Yeh Hai Mohabbatein News Actress Neeru Agarwal Dies
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, प्रमोद संजय वाघ वय १८ रा. तिगाव संगमनेर हा युवक ६ ऑक्टोबर रोजी घरातून कॉलेजमध्ये जातो असे सांगून गेला होता. मात्र तो घरी परत न आल्याने दिनांक ९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पालकांनी तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. या चौकशीतून काही संशयित मित्रांची नावे पोलिसांना समजले असता त्यानुसार पोलिसांनी प्रमोद वाघ याची एका मित्राकडे सखोल कॅहुकाशी करत पोलीस खाकी दाखविल्याने त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार आज सकाळी या आरोपीने पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना तालुक्यातील खांडगाव येथे कपालेश्वर मंदिराजवळ असणाऱ्या एका तलावाजवळ नेऊन प्रमोद वाघ यांचा मृतदेह दाखविला.
दरम्यान अल्पवयीन आरोपी व मयत प्रवीण वाघ हे दोघेही खांडगाव येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या एका मुलीच्या प्रेम प्रकरणावरून वाद झाला व त्याच रागातून अल्पवयीन असलेल्या आरोपीने प्रमोद याचा चाकूने भोकसून खून केला व त्याचा मृतदेह खांडगाव येथील कपालेश्वर मंदिराजवळ असणाऱ्या तलावाजवळ टाकला.
एका मिसिंग केस वरून पो.नि. सुनील पाटील व त्यांच्या सहकार्याने अवघ्या दोन दिवसातच या प्रकरणाचा छडा लावला. याप्रकरणी सदर आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला त्याला बाल सुधारगृहात पाठविण्यात येणार असून पुढील तपास पो.नि. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. खुळे करत आहे.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा