Home क्राईम संगमनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह, गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह, गुन्हा दाखल

संगमनेर: एका १७ वर्षीय मुलीशी विवाह केल्याप्रकरणी नवरदेवासह त्याचे आई वडील, भाऊ, मुलीचे आई वडील अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी येथे शुक्रवारी ३ जुलै दुपारी साडे बारा वाजता हा प्रकार घडला.

कुरकुंडी येथील ग्रामसेवक संदेश भाऊसाहेब यादव यांनी याबाबत तक्रार दिली आहे. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांना अज्ञात व्यक्तीने कुरकुंडी येथे सभा मंडपात एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावले जात असल्याची माहिती फोनद्वारे देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. मात्र तोपर्यंत विवाह संपन्न झाला होता. पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यीनी ग्रामसेवक संदेश यादव यांना बोलावून घेतले. लग्न झालेल्या मुलीच्या वयाची पोलिसांनी खात्री केली असता ती अल्पवयीन असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी नवरदेव आई वडील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर पोलीस आणत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अतुल गुलाब सूर्यवंशी(नवरदेव), जितेंद्र गुलाब सूर्यवंशी(भाऊ), गुलाब रामदास सूर्यवंशी(वडील) यांच्यासह मुलीचे आई वडील असे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नाद्रा येथील राहणारे आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Website Title: Sangamner taluka Marriage of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here