संगमनेर तालुका ग्रामपंचायत निवडणूक निकाल लाइव्ह, थोरात गट वि. विखे गट
:
लाइव्ह अपडेट :
हाती आलेला संपूर्ण तालुका ग्रामपंचायत निकाल:
थोरात यांच्या गटाला २७ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे: शेतकरी विकास मंडळाच्या ज्योती पवार (खराडी), सुनीता शिंदे (वाघापूर), शांताबाई कुदनर (जांभुळवाडी), बाबाजी गुळवे (रणखांबवाडी), आनंदा दुगुर्डे (दरेवाडी), सोनाली शेटे (जांबुत), रोहिणी भागवत (कर्जुले पठार), नारायण मरगळ (पिंपरणे), सुरेखा खेमनर (अंभोरे), गिरीजा साबळे (ओझर खुर्द), लता खताळ (धांदरफळ खुर्द), उज्ज्वला देशमाने (धांदरफळ बु.), गायत्री माळी (चिकणी), पांडूरंग सुपेकर (वडझरी खुर्द), कमल कांगणे (हंगेवाडी), बाळासाहेब आहेर (करुले), शशीकला पवार (निळवंडे), अर्चना भुसाळ (उंबरी बाळापूर), विलास सोनवणे (चिंचोली गुरव), संध्या गोर्डे (वडझरी बु.), पुष्पा गुंजाळ (कोळवाडे), प्रतिभा जोंधळे (निमगाव जाळी), सचिन सोनवणे (साकूर), ज्योती कडलग (निमगाव भोजापूर), सुदाम खैरे (पोखरी हवेली) व बिनविरोध सरपंच निवड झालेल्या नीलम पारधी (सायखिंडी), मंगल काकड (डोळासणे).
विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाने ९ ग्रामपंचायती मिळविल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे: सुवर्णा दिघे (कोल्हेवाडी), सुवर्णा घुगे (मालुंजे), भगीरथाबाई काठे (निंबाळे), प्रीती दिघे (जोर्वे), संदीप देशमुख (निमोण), नारायण गुंजाळ (सादतपूर), सविता शिंदे (रहिमपूर), ज्योती पचपिंड (कणकापूर), उषा दिघे (तळेगाव दिघे)
संगमनेर तालुका ग्रामपंचायती निवडणूका झालेल्या ३७ ग्रामपंचायतींमध्ये थोरात गटाने 27, विखे गटाने 9 तर सोपान राऊत यांच्या स्वतंत्र गटाने घुलेवाडीचे सरपंचपद मिळवले आहे. घुलेवाडी राऊत गटाच्या निर्मला राऊत यांनी विजय मिळविला आहे.
आपल्या कीर्तनातून कायम राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणाऱ्या कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाईंनी सरपंचपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलाय. मी कोणत्याच पक्षाला सपोर्ट करत नाही. मी सर्वपक्षीय आहे, असं इंदोरीकर महाराज गमतीने सांगत असतात. पण योगायोग म्हणजे महाराजांच्या सासूबाईंनीही अपक्ष विजय मिळवलाय.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या दुरंगी लढतीत शशिकला शिवाजी पवार विजयी झाल्या असून शशिकला पवार या समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या सासूबाई आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीला उत्तम पवार यांचा पराभव करत शशिकला पवार यांनी २२७ मतांनी विजय मिळवलाय.
घुलेवाडी सरपंचपदी सोपान राउत गटाच्या निर्मला कैलास राउत अपक्ष विजयी तर इतर सर्व जागा थोरात गटाला
पोखरी हवेली ग्रामपंचायत पदी थोरात गटाचे सुदाम गोरख खैरे विजयी
घुलेवाडी कॉंग्रेसचे ५ सदस्य विजयी प्रभाग १ व २ चे निकाल
निमगाव भोजापूर ग्रामपंचायत: सरपंचपदी थोरात गटाच्या ज्योती मच्छिंद्र कडलग विजयी
तळेगाव दिघेमध्ये विखे गटाचा सरपंच उषा रमेश दिघे विजयी
साकुर मध्ये थोरात गटाचे वर्चस्व सरपंचपदी सचिन दिनकर सोनवणे- एक सदस्य विखे गटाचा
चिकणी ग्रामपंचायत सरपंचपदी थोरात गटाच्या गायत्री सुरेश माळी
धांदरफळ खुर्द – थोरात गटाच्या लता भास्कर खताळ सरपंचपदी
निमगाव जाळी सरपंच पदी थोरात गटाच्या प्रतिभा सोमनाथ जोंधळे – विखेंना धक्का
चिंचोली गरव विलास रामराव सोनवणे सरपंच पटी
निमगाव जाळी सरपंच पदी थोरात गटाच्या प्रतिभा सोमनाथ जोंधळे – विखेंना धक्का
चिंचोली गुरव विलास रामराव सोनवणे सरपंच पदी विजयी
जांभुळवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी थोरात गटाच्या शांताबाई अण्णासाहेब कुदनर विजयी
दरेवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी थोरात गटाच्या आनंदा रावसाहेब दरगुडे विजयी
रणखांबवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी बाबाजी मल्हारी गुळवे विजयी
खराडी ग्रामपंचायत सरपंच पदी थोरात गटाच्या ज्योती बाळासाहेब पवार विजयी
कर्जुले पठार सरपंच पदी थोरात गटाच्या रोहिणी वाल्मीक भागवत
पिंपरणे सरपंच पदी थोरात गटाचे नारायण सिताराम मरमळ
डोळसणे मंगल बाळासाहेब काकड काँग्रेस
धांदरफळ बु – थोरात गटाच्या उज्वला नवनाथ देशमाने सरपंचपदी सर्व १३ जागा थोरात गटाकडे
20 पैकी 8 ग्रामपंचायतीवर विखे गटाचे सरपंच
राहिमपूर विखे गटाचा सरपंच सौ. सविता लक्ष्मण शिंदे
हंगेवाडी थोरात गटाच्या कमल राजेंद्र कांगणे सरपंच
उंबरी बाळापूर थोरात गटाकडे सरपंच अर्चना सुभाष भुसाळ सह 6 जागा
ओझर खुर्द थोरात गटाच्या गिरीजा अण्णासाहेब साबळे सरपंच पदी
अंभोरे – थोरात गटाचे नारायण खेमनर सदस्यपदी
पाचव्या फेरीची प्रक्रिया सुरू आहे
18 ग्रामपंचायतपैकी, 12 थोरात गट सरपंच 6 विखे गट सरपंच
मालूनजे मध्ये शेखर सोसे सदस्यपदी निवड
संगमनेर तालुक्यात विखे गटाचा मोठा शिरकाव
जोर्वे, निंबाळे, मालूजे, निमोण, कोल्हेवाडी 5 ग्रामपंचायत विखे गटाकडे
निमोण मध्ध्ये विखे गटाचे संदीप देशमुख सरपंच
जांबुत थोरात गट- शिवसेना आघाडी 2 जागा विजया
संगमनेर निंबाळे ग्रामपंचायत विखेंच्या ताब्यात थोरात गटाला धक्का
कोल्हेवाडी ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाकडे ; सौ. सुवर्णा राहुल दिघे सरपंच पदी विजयी…
जोर्वे गावात सरपंच विखे गटाचा तेरापैकी चार जागांवर विखे तर नऊ जागांवर थोरात गटाचा विजय
आता पर्यंत 10 ग्रामपंचायत थोरात गटाकडे
गुंजाळवाडी पठार मध्ये थोरात गटाची सत्ता; महाविकास आघाडीचे 3 सदस्य विजयी
साकुरमध्ये पुन्हा थोरात गट
कोल्हेवाडी विखे गट 14 / थोरात गट 0 विखे गट सत्ता
पहिल्या फेरीमध्ये वाघापूर, खराडी, चिंचोली गुरव, जांभूळवाडी, सायखिंडी, रणखांबवाडी, दरेवाडी या सातही ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत
खराडी ग्रामपंचायत सरपंच पदी थोरात गटाच्या ज्योती बाळासाहेब पवार विजयी…..
वाघापूर ग्रामपंचायत सरपंच पदी थोरात गटाच्या सौ. स्मिता नानासाहेब शिंदे विजयी…..
जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation. भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC. सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.
Web Title: Sangamner Taluka Gram panchayat Election Result Live
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App