Sangamner: संगमनेर तालुक्यात ४२ जण करोना बाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात मंगळवारी ४२ करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधित संख्या ३ हजार ८१४ इतकी झाली आहे.
मंगळवारी शहरात १३ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून, संगमनेर शहरालगत मालदाड रोड वरील ६४ व ४७ वर्षीय इसम, रहेमतनगर परिसरातील ६६ वर्षीय महिला, इंदिरानगर ५९ वर्षीय महिला, गणेशनगर ५८ वर्षीय महिला व २८ वर्षीय तरुण, जनतानगर ५२ वर्षीय व्यक्ती, २४ वर्षीय तरुण, ४८ वर्षीय महिला व १७ वर्षीय तरुणी व संगमनेर शहरातील ३ जणांचे अहवालही पॉझिटिव आले आहेत.
मंगळवारी तालुक्यातील ग्रामीण भागात २९ जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. ओझर खुर्द येथील २८ वर्षीय तरुण, बोटा येथील ३२ वर्षीय तरुण, भोजदरी ६७ व ५० वर्षीय व्यक्ती, ४५ वर्षीय महिला, कुरकुटवाडी ४० वर्षीय महिला, झोळे ४३ वर्षीय महिला, चंदनापुरी ३२ वर्षीय तरुण, आंबी खालसा ३० वर्षीय तरुण, ४५ व २१ वर्षीय महिला, तसेच १ वर्षवर्षीय बाळ, पिंपळे येथील ५५ वर्षीय महिला, डिग्रस ३५ वर्षीय तरुण, गुंजाळवाडी मधील ३६ वर्षीय तरुण, निर्मलनगर परिसरातील ६७ वर्षीय महिला, कोळवाडे ४५ वर्षीय महिलेसह २३ वर्षीय तरुण,
घुलेवाडी येथील ३९ वर्षीय व्यक्ती व २१ वर्षीय महिला, वरुडी पठार ४७ वर्षीय इसम, निमगाव जाळी ५८ वर्षीय इसम, राजापूर ३८ व २० वर्षीय तरुण, पिंपळगाव कोंझिरा येथील ७३ वर्षीय महिला, सारोळे पठार ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कासारा दुमाला ५१ वर्षीय व्यक्ती, संगमनेर खुर्द येथिल ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक, हिवरगाव पावसा २२ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Sangamner taluka Corona update 42 patient New