Sangamner Corona News: संगमनेर तालुक्यात २२ करोनाबाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात मंगळवारी २२ करोनाबाधित आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात मागील काही दिवसांच्या तुलनेत संख्या कमी झालेली दिसून येत आहे, हे संगमनेरच्या नागरीकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
संगमनेर तालुक्यात शिबलापूर येथील ६२ वर्षीय महिला, ६५ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष यांना करोनाची बाधा झाली आहे. आश्वी खुर्द येथे ५० वर्षीय महिला, २४ वर्षीय तरुणी, ८ वर्षीय मुलगा, कुरकुटवाडी येथील ३२ वर्षीय तरुण, ६२ वर्षीय पुरुष, २२ वर्षीय तरुण, ६९ वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथील ४७ वर्षीय महिला, ३० वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथे ७२ वर्षीय पुरुष, राजापूर येथील २५ वर्षीय तरुण, चिकणी येथे ७ वर्षीय बालक, ३६ वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे ४५ वर्षीय महिला, वडगाव पान येथील ३२ वर्षीय पुरुष, ३ वर्षीय बालक, कोल्हेवाडी येथे ४९ वर्षीय पुरुष असे मंगळवारी २२ ने करोनाबाधितांचा आकडा वाढला आहे.
Web Title: Sangamner taluka Corona News 22 infected