संगमनेर तालुक्यात दारूच्या नशेत एकाने तोंडात जिलेटीन फोडून आत्महत्या
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथे मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास एका ४६ वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत तोंडात जिलेटीन फोडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. स्पोटात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
सुखदेव किसान मधे रा. अकलापूर ता. संगमनेर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुखदेव मधे हा मंगळवारी रात्री दारूच्या नशेत घरी आला. काही वेळातच त्याने जिलेटीन कांडी तोंडात धरून वीज बोर्ड मधून करंट घेत आपली जीवनयात्रा संपविली. झालेल्या स्पोटात सुखदेव जागीच ठार झाला.
आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, संगमनेर उप विभागीय पोलीस अधिकारी रोषण पंडित, पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे करीत आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Sangamner Taluka Akalapur one man sucide