संगमनेर तालुक्यात शेतीमाल भावाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या- Suicide
Ahmednagar | Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी अजमपूर येथील शेतकरी संतोष पांडुरंग लावरे वय ३८ याने शेतमालाला मिळणाऱ्या कवडीमोल भावाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. (Ahmednagar News)
लावरे यांची कोरडवाहू शेती आहे. परंतु नापिकीमुळे त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर होत नसल्याने ते मजुरीचे काम करीत होते. आर्थिक परिस्थितीला कंटाळून लावरे यांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.
Web Title: Sangamner taluka, a young farmer committed suicide by strangling his farm brother