Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात आज तब्बल ५७ करोनाबाधित

Sangamner: संगमनेर तालुक्यात आज तब्बल ५७ करोनाबाधित

Sangamner taluka 57 corona infected today

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात करोनाचा प्रसार हा चांगलाच वाढताना दिसत असताना यात आणखी भर पडतच आहे. संगमनेर तालुक्यात सकाळी शहरात १३ तर ग्रामीण भागात ५ असे १८ रुग्ण करोनाबाधित आढळून आले.

त्यांनतर दुपारी पुन्हा एकदा ९ अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे दिवसभरातील संख्या २७ झाली.

संगमनेर शहरात १३ तर ग्रामीण भागात ५ असे १८ रुग्ण

आज दुपारी प्राप्त झालेल्या शासकीय व खासगी अहवालानुसार देवाचा मळा येथे ३० वर्षीय पुरुष, ७,३१ वर्षीय महिला, महात्मा फुले नगर येथे ३१ वर्षीय तरुण,घुलेवाडी येथे ३० वर्षीय महिला, ९ वर्षीय मुलगा, ४८ वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे २७ वर्षीय तरुणी, चिकणी येथे २८ वर्षीय तरुण असे ९ रुग्ण आढळून आले.  

सकाळी चार पोलिसांना बाधा झाल्याची स्पष्ट झाले होते. त्यानंतर आणखी ८ पोलीस करोनाबाधित आढळून आल्याने संगमनेर तालुक्यात एकूण १२ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. 

आज सायंकाळी आणखी ३० अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालानुसार शहरातील अकोले नाका येथे ५३ वर्षीय पुरुष, अकोले रोड येथे ३८ वर्षीय महिला, नवीन नगर रोड येथे ६१ वर्षीय महिला, जमजम कॉलनी येथे १७ वर्षीय तरुण ४० वर्षीय व्यक्ती व १३ वर्षीय मुलगी, मालदाड रोड येथील ३५ वर्षीय पुरुष, २९, ४५ वर्षीय महिला, घासबाजार येथील ७५ वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे ४२ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला, २० वर्षीय तरुण, शिवाजीनगर येथे २७ वर्षीय तरुण असे १४ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. 

तालुक्यातील कनोली येथे ३० वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील ४३ वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथे ४३ वर्षीय तरुण, निम्बाले येथील ३० वर्षीय महिला व १५ वर्षीय मुलगी, आंबी खालसा येथील १२,१६,१८,३७ वर्षीय महिला, घुलेवाडी येथील ३५, ३७,४२,५३,५१,५० वर्षीय पुरुष व ३३ वर्षीय महिला असे सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ७५८ इतकी झाली आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner taluka 57 corona infected today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here