संगमनेर तालुक्यात ४९ करोनाबाधित, ग्रामीण भागात संख्या वाढली
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात मंगळवारी 49 करोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये ग्रामीण भागात अधिक प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. गुंजाळवाडी येथे सर्वाधिक तब्बल 12 बाधित आढळून आले आहेत.
मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात, माळीवाडा 64 वर्षीय महिला, विद्यानगर येथे 46 वर्षीय पुरुष, पंचायत समिती येथे 40 वर्षीय पुरुष, घोडेकर मळा 30 वर्षीय महिला, देवाचा मळा येथील 23 वर्षीय तरुण, संगमनगर येथील 69 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष बाधित आढळून आले आहेत.
तर तालुक्यात नांदूर खंदरमाळ येथे 65,77 वर्षीय पुरुष, उंबरी बाळापूर येथे 60 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, प्रतापपूर येथे 44 वर्षीय पुरुष, माळेगाव हवेली येथे 40 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडीत 85, 62 वर्षीय वयोवृद्ध, 35, 28, 20 वर्षीय पुरुष, 60, 40, 35, 30, 25, 18 वर्षीय महिला, 12 वर्षीय बालिका, सुकेवाडी येथे 55 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, निमगाव भोजापूर येथे 45 वर्षीय महिला,सांगवी येथे 67, 47 वर्षीय महिला, निमगाव पागा येथे 65 वर्षीय महिला, शेडगाव येथे 41 वर्षीय पुरुष, खंदरमाळवाडी येथे 45 वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथे 52 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, कवठे बुद्रुक येथे 32 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला,समनापुर येथे 51 वर्षीय पुरुष, हंगेवाडी येथे 80 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे 61,52 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे 52 वर्षीय पुरुष, पळसखेड येथे 78 वर्षीय पुरुष, 67 वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथे 31 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, रायतेवाडी येथे 39 वर्षीय पुरुष असे 49 करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील बाधितांची संख्या तीन हजार 504 इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Sangamner taluka 49 corona infected Tuesday