संगमनेर तालुक्यात आज ३८ करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात आज 38 नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 5 हजार 815 इतकी झाली आहे.
आज अहवाल प्राप्त झालेल्यांमध्ये शहरातील चैतन्य नगर येथील 77 वर्षीय पुरुष, मिसाल हाऊस येथे 53 वर्षीय महिला, पद्मनगर येथे 37 वर्षीय महिला, अकोले नाका येथे 56 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा, संगमनेर 45, 44 ,33 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.
तर ग्रामीण भागातून चंदनापुरी येथे 49 वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथे 42 वर्षीय महिला, धांदरफळ येथे 62 वर्षीय पुरुष, निमज येथे 40 वर्षीय पुरुष, खांडगाव येथे 21 वर्षीय तरुण.कर्जुले पठार येथे 53 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे 47 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय तरुण, वडगाव पान मध्ये 50, 45 वर्षीय, 29 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथे 55,35 वर्षीय पुरुष, शेडगाव येथे 32 वर्षीय पुरुष, शिबलापुर येथे 40 वर्षीय महिला, अकलापुर येथे 26 वर्षीय तरुण, भोजदरी येथे 17 वर्षीय तरुणी, केळेवाडी येथे 23 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथे 8,4 वर्षीय बालक, कर्हे येथे 52 वर्षीय पुरुष 50 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुणी, पिंपळगाव देपा येथे 60,53 वर्षीय पुरुष, राजापूर येथे 53 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, मालदाड येथे 70 वर्षीय महिला असे 38 बाधित आढळून आले आहेत
Web Title: Sangamner taluka 38 corona positive report Today