Sangamner: संगमनेर शहरात आज बाधितांची संख्या वाढली
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात आज शहरात 15 तर ग्रामीण भागात 15 असे 30 रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 3 हजार 886 वर पोहोचली आहे.
आज गुरुवारी शहरात नवीन नगर रोड 46 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, देवाचा मळा येथे 26 वर्षीय तरुण, नेहरु चौक 80 वर्षीय महिला, शिवाजीनगर येथे 78 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 42,35 वर्षीय पुरुष, 37,37 वर्षीय महिला, 7 वर्षीय बालक, जनतानगर येथे 59 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय महिला, साईनगर येथील 21 वर्षीय महिला, पोलिस वसाहतीतील 50 वर्षीय पुरुष, सदाशंकर नगर येथे 42 वर्षीय महिला, असे बाधित आढळून आले आहेत.
तर तालुक्यातही गुंजाळवाडी येथील 55 वर्षीय महिला, निमगाव खुर्द येथे 30 वर्षीय महिला, कनोली येथे 59 वर्षीय पुरुष, सारोळे पठार येथे 69 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय तरुण, 60, 27 वर्षीय महिला, राजापूर येथील 42 वर्षीय तरुण, झोळे येथे 22 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथील 39 वर्षीय पुरुष, माळेगाव हवेली येथे 80 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 42, 35,34 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा असे बाधित आढळून आले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Sangamner taluka 30 increased city patient