Sangamner: संगमनेर तालुक्यात 29 करोनाबाधितांची भर
संगमनेर | Sangamner: तालुक्यात रविवारी प्राप्त अहवालात 29 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दररोजच्या आकडेवारीनुसार रविवारी करोनाबाधितांची संख्या थोडीशी कमी झाली आहे. संगमनेर तालुक्यासाठी ही बाब दिलासादायक ठरत आहे.
रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात पावबाकी रोड येथे 37 ,35 वर्षीय पुरुष, पवार मळा येथे 75 वर्षीय पुरुष, जानकीनगर येथे 70 वर्षीय पुरुष, घोडेकर मळा येथे 30 वर्षीय पुरुष, माळीवाडा येथे 33 वर्षीय पुरुष, कुरणरोड येथे 26 वर्षीय पुरुष भारत नगर येथील 46 वर्षीय पुरुष बाधित आढळून आले आहेत.
तर तालुक्यात राजापूर येथे 47 वर्षीय पुरुष, नांदुरी दुमाला येथे 65 वर्षीय महिला, जाखोरीयेथे 48 वर्षीय पुरुष, शिंदोडी येथे 35 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे 51,50 वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे 62 पुरुष, कनोली येथे 45 वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे 61 वर्षीय पुरुष, चिखली येथे 52 वर्षीय पुरुष, चिकणी येथे 56 वर्षीय पुरुष, आश्वी खुर्द येथील 57 वर्षीय पुरुष, समनापुर येथे 52 वर्षीय पुरुष, घुलेवाडी मधील 55 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय मुलगा, गुंजाळवाडी मधील 41 वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा मधील 75 पुरुष, 40, 18, 17 वर्षीय पुरुष, ओझर खुर्द येथे 48 वर्षीय पुरुष असे 29 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहे. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 3 हजार 425 इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Sangamner taluka 29 corona positive