Sangamner: संगमनेर तालुक्यात १६ करोनाबाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात रविवारी सायंकाळी प्राप्त अहवालात १६ करोनाबाधित आढळून आले आहे. तालुक्याची एकूण रुग्ण संख्या २३२१ इतकी झाली आहे. तालुक्यात मागील काही दिवसांच्या तुलनेत रविवारी संख्येमध्ये घट झालेली दिसून येत आहे.
रविवारी प्राप्त अहवालानुसार शहरातील गोविंदनगर येथे ४३ वर्षीय पुरुष, पिंपळने येथील ७० वर्षीय महिला, निमगावजाळी येथील ४२ वर्षीय पुरुष, निमगाव टेंभी येथे ३४ वर्षीय पुरुष, निमोन येथे ४८ वर्षीय पुरुष, मनोली येथे ७०,५५ वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे ६४ वर्षीय महिला, निळवंडे येथे ५६, ५३ वर्षीय पुरुष, वनकुटे येथील ७५ वर्षीय पुरुष, कौठे बुद्रुक येथे ४६ वर्षीय महिला, वडगाव पान येथे ४२ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ५४ वर्षीय पुरुष, मंगळापूर येथे २३ वर्षीय तरुणी, २१ वर्षीय तरुणी असे १६ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने रुग्ण संख्या २ हजार ३२१ इतकी झाली आहे.
See: Latest Entertainment News and Latest Marathi News
Web Title: Sangamner Taluka 16 corona infected News