Sangamner News: अकलापूर येथे १८ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर येथे १८ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवार दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना समोर आली आहे.
सागर शरद जाधव( वय १८) हल्ली रा. अकलापूर ता. संगमनेर मुळ रा. चास ठाकरवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे असे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत घारगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहे. या युवकाने का केली यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.
Web Title: Sangamner Suicide of youth in Plateau area
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App