Home संगमनेर संगमनेर: सासरच्या छळास कंटाळून तरुण विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

संगमनेर: सासरच्या छळास कंटाळून तरुण विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Sangamner Suicide of a young married woman after being harassed 

Sangamner | संगमनेर: सासरच्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रुपाली गितेश कोठवळ असे या आत्महत्या (Suicide) केलेल्या तरुण विवाहितेचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे ही घटना ३१ मार्च २०२२ रोजी घडली. याप्रकरणी पती गितेश बाळासाहेब कोठवळ, बाळासाहेब रामभाऊ कोठवळ रा. पेमगिरी, अनिल गोडसे रा. गोडसेवाडी यांच्यासह पाच जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईल घेऊन सारखी कोणाला कोणाला फोन करत बसते, माहेरच्याशी तासनतास बोलत बसते, तंबाखूने दात घासते अशा वेगवेगळ्या कारणांनी या विवाहित महिलेला सासरचे लोक शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करीत होते. तिचा वारंवार छळ होत असल्याने या सर्व प्रकाराला कंटाळून तिने ३१ मार्च रोजी सायंकाळी घरामागच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रुपालीच्या पालकांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sangamner Suicide of a young married woman after being harassed 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here