Home संगमनेर संगमनेरमध्ये दुधाचे नाव असलेल्या टेम्पोत गोमांस वाहणारा टेम्पो पकडला

संगमनेरमध्ये दुधाचे नाव असलेल्या टेम्पोत गोमांस वाहणारा टेम्पो पकडला

Sangamner Seized beef flowing tempo in the name of milk

संगमनेर: दुध वाहतुकीच्या नावाखाली टेम्पोतून गोमांस वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे गोमांस मालेगावहून मुंबईला नेण्यात येत असताना संगमनेर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार टन गोमांस व वाहतूक करणारा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर मुंबईतील टेम्पो चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी पहाटे नाशिक पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली.

नाथा मनोहर रसाळ वय ४२ रा. कुरेशीनगर मुंबई असे या टेम्पो चालकाचे नाव आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक जाधव यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना दुधाच्या टेम्पोतून गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.

रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याचे कर्मचारी टोल नाका येथे तपासणी करत असताना दुध नाव लिहिलेल्या पांढरया रंगाच्या आयशर टेम्पोची पोलिसांनी तपासणी केली असता यात मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले. यावेळी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मालेगावहून मुंबईला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

चार लाख ५० हजार रुपये किमतीचा टेम्पो व चार लाख रुपयांचे गोमांस असा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एस.एस. पाटोळे हे करीत आहेत.

Web Title: Sangamner Seized beef flowing tempo in the name of milk

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here