Sangamner: दोन वर्षीय बालकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे सकाळी १० वाजेच्या सुमारास दुर्दैवी अशी घटना घडली. शेततळ्यात बुडून अवघ्या दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हर्षल कुंभकरण नेहे असे बालकाचे नाव आहे.
याबाबत मयत हर्शल यांचे चुलते बंडू बादशहा नेहे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तो खेळता खेळता शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याचे बंडू नेहे यांनी खबरीत सांगितले आहे.
बंडू नेहे व कुंभकरण हे शेजारी आपल्या कुटुंबासमवेत राहतात. कुंभकरण यांचा दोन वर्षाचा मुलगा हर्शल शनिवारी सायंकाळपासून कोठेही सापडत नव्हता. तेव्हापासून नेहे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला असता हर्शल हा शेततळ्याकडे गेला असल्याची शंका आल्याने शेततळीमधील पाणी उपसत असताना हर्षल रविवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान शेततळ्यात आढळून आला. त्याला उपचार करण्यासाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे स्पष्ट केले.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Sangamner Savargaon Tal Two-year-old boy drowns in farm